तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 June 2018

शौचालय तर बांधले माञ अनुदानासाठी झिजवावे लागत आहेत सरकारी कचेरीचे ऊंबरठे

                                                                                                            फुलचंद भगत-मंगरुळपीर
केंद्र सरकार व राज्यसरकारने घर तेथे शौचालय असणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार अनेकांनी मंगरुळपीर तालुक्यात शौचालये बांधली मात्र ज्यांनी शौचालयांची बांधकामे पूर्ण केली आहेत अशा अनेक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कमच मिळालेली नसल्याचे समजते. लाभार्थी मात्र बँकेत अनेकदा हेलपाटे मारून मारून त्रस्त झाले आहेत.
घरात शौचालय नसल्यास त्या कुटुंबास स्वस्त धान्य व रॉकेलसाठी लागणारे पंचायतचे प्रमाणपत्र मिळणार नाही, असे कडक नियम करून शासनाने घर तेथे शौचालय बांधण्यास भाग पाडले. त्यासाठी शासन प्रोत्साहन देत असुन शौचालय बांधल्यास १२ हजार रुपये शासनामार्फत अनुदान दिले जात आहे. गाव १०० टक्के हागणदारी मुक्त व्हावे म्हणुन शासनाने जो शौचालय बांधेल त्याला १२ हजार रुपये अनुदान देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी करोडो रुपये सर्व पंचायत समितीत जमा केले आहेत.काहींनी तर दोनदा या योजनेचा लाभ घेतला तसेच शौचालय न बांधताही अनुदान लाटल्याचे समजते.मंगरुळपीर पंचायत समितीचे बिडिओ,इंजिनियर आणी जिल्हा पथकाने  गावागावात  स्वत: येवुन प्रत्यक्ष पाहणी केली तर सत्य बाहेर येईल. शौचालय बांधणाऱ्या कुटूंबातील व्यक्तींचे फोटो काढुन व ग्रामविकास अधिकारी  यांनी फार्मवर सही करून शौचालय बांधल्याची खात्री झाली की अनुदान खात्यात जमा केल्या जाते.शौचालये बांधकाम करुनही अनेकांना  लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेलीच नाही.
गुडमार्निंग पथक येऊन गोरगरीब लोकांची फजिती करून जे उघड्यावर बसत होते अशांना कायद्याचा बडगा दाखवला जात होता. मंगरुळपीर,शेलुबाजार पोलीस ठाण्यात त्यांना बसवुन एका व्यक्तीस १ हजार २०० रुपये दंड करण्यात आला. ऊघड्यावर शौचास बसणार्‍या गावातील लोकांकडून हजारो रुपये वसुलही केलेत. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी गोरगरीबांनी व्याजी रक्कम काढुन शौचालय बांधले. तरीही काही लाभार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा होत नसल्याने गोरगरीब जनता संतप्त आहे. दररोज बँकेत खात्यावर पैसे जमा झाले का नाही पाहण्यासाठी चकरा मारताना दिसत आहेत,सोबतच पंचायत समितीचे ऊंबरठे लाभार्थी झिजवत आहेत. इंजिनिअर मात्र खात्यावर आज पैसे टाकतो, उद्या टाकतो असे सांगत लोकांना तंगवत असल्याचे काही लाभार्थ्याकडुन समजले.
वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या योजनेची चौकशी करावी आणि गरीबांचे प्रत्येकी १२ हजार रुपये अडविण्यामागचे काय कारण आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.                               फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835

No comments:

Post a Comment