तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

सोनपेठ पोलिस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन


प्रा. डॉ. संतोष रणखांब
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील पोलिस ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवासाठी पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी,  प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही पोलीस ठाणे सोनपेठ येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमा नंतर मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली. या इफ्तार पार्टीसाठी तहसिलदार जिवराज डापकर, उपनगराध्यक्ष दत्ताराव कदम,  न. प. गटनेते चंद्रकांत राठोड, दत्ताराव भाडूळे,  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मधुकरराव निरपणे,  प्रभाकरराव सिरसाठ,  मारोतराव रंजवे, धनंजय देशमुख, विनोद चिमणगुंडे, नगरसेवक निलेश राठोड, शरद बनसोडे, सुरेश लोढा, आनंद गुजराथी, सैफुल्ला सौदागर,  मलिक बागवान, पत्रकार गणेश पाटील, सुभाष सुरवसे, सुधिर बिंदू,  कृष्णा पिंगळे, भागवत पोपडे,  मंजुर मुल्ला सिद्धेश्वर गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पो. नि. सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस जमादार अनिल शिंदे, संजय काळे, सुधाकर मुंढे, भिसे, कांबळे, महेश कावठाळे, तांदळे, ओम यादव,घरजाळे, खरात, आगळे, निलपत्रेवार, महिला पोलीस कदम, यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, याप्रसंगी मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment