तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

पावसाने गेवराईतील घर पडले; लहान मुले किरकोळ जखमी

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 5 __ मंगळवार, दि. 5 जुन रोजी पहाटे गेवराईत  पाऊस झाला. झालेल्या या पावसाने गेवराई शहरातील संजयनगर मधील भिल्ल वस्ती येथील सुदर्शन बाबुराव बर्डे यांचे मातीचे असलेल्या घरांच्या भिंती अचानक पडल्या. परिणामी या कुटुंबातील लहान मुले आत असल्याने त्यांच्या डोक्याला व कंबरेला किरकोळ मार लागला आहे.
     याविषयी अधिक माहिती अशी की, गेवराई शहरातील संजयनगर मध्ये विविध जाती धर्मातील सर्व गोरगरिब लोक रहात आहेत. तिथे शक्यतो मातीचे बांधकाम व पञ्याचे शेड जास्त आहेत. आज मंगळवार, दि. 5 जुन रोजी पहाटे पासुन गेवराईत पावसाला सुरुवात झाली होती. चालु झालेल्या पावसाने शहरातील संजयनगर मधील भिल्ल वस्तीतील सुदर्शन बाबुराव बर्डे यांचे मातीचे घर पडले अशी माहिती तलाठी व मंडळ आधिकारी यांना देऊन पंचनामा करण्यासाठी सुचना केली. त्यामुळे तलाठी राजेश राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व जखमींना रूग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले.
     यावेळी शेख शब्बीर, शेख खाजा, मुरली बर्डे, भारत बर्डे, केरबा बर्डे, सय्यद रफिक, शेख मुस्सा, राजेंद्र माळी, शेख बाबु, सय्यद अंबर आदि उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
-----------------------------------
--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----
------------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment