तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

पत्रकार व सोनपेठ पोलिसांच्या वतीने निरोप समारंभ संपन्न


प्रा.डॉ. संतोष रणखांब,
तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील पोलीस ठाण्यात आपल्या कार्यतत्परतेने ठसा उमटवणारे अधिकारी सपोनि सदानंद येरेकर व सपोनि बाबुराव जाधव यांची बदली हिंगोली जिल्ह्यात झाली असल्याने त्यांचा सोनपेठ पोलीस ठाणे, पत्रकार बांधव यांच्या वतीने निरोप संमारभ आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक सोपानराव सिरसाठ होते.
सोनपेठ पोलीसठाण्यात कार्यरत असलेले सपोनि बाबुराव जाधव व सपोनि सदानंद येरेकर हे दोन अधिकारी परिसरातील जनतेत त्यांच्या कार्यतत्परतेमुळे व जनतेशी जिव्हाळ्याचे सबंध निर्माण करणारे म्हणून ओळखले जातात, त्यांची नियमित बदली अंतर्गत जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्यामुळे बदली झाली असून त्याबद्दल पोलिस ठाणे सोनपेठ व पत्रकार संघाच्या वतीने निरोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना दोघांनीही परिसरातील नागरीकांनी व सहकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याची भावना व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांनी मनलावून जिव्हाळ्याने काम करणारे दोन्ही सहकारी अतिशय कर्तव्यदक्ष होते. कोणतेही काम मनातून केल्यास उत्कृष्ट बनते याचे उदाहरण या दोन अधिकाऱ्यांनी दाखवले असे मत व्यक्त केले. यावेळी सुत्र संचालन गणेश पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक पत्रकार सुधीर बिंदू, यांनी केले, सपोनि मुपडे,  प्रा.डॉ. संतोष रणखांब, पोलीस कर्मचारी देवराव मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे यांनी मानले. यावेळी पोहेकॉ. अनिल मुंडे, पोहेकॉ. काळे, पोकॉ. मोरे, पोकॉ.भिसे, पोकॉ.कांबळे, पोकॉ. महेश कवठाळे,पोकॉ. आडे, पोकॉ, ओम यादव, पोकॉ. थोरात, पोकॉ. पवार, पोकॉ. घरजाळे, पोकॉ. परसोडे, पोकॉ, निलपत्रेवार, पोकॉ. शितल हाके पत्रकार सुभाष सुरवसे, मंजुर मुल्ला, कृष्णा पिंगळे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी, पत्रकार व नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment