तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

आष्टी पोलिसांच्या सतर्कतेमुळे बँकेवरील दरोदेखोरांचा दरोड्याचा डाव फसला.


बीड - आष्टी येथील बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीचा आष्टी पोलिसांच्या सतर्कतेमुळे डाव फसला असून या दरोडेखोरांना आष्टी पोलिसांनी जेरबंद केले आहे. ११ जून रोजी पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुका हद्दीतील प्रमुख भागात गुन्हेगार वसाहतीत शोधमोहीम घेण्यात आली होती.सर्व अधिकारी आणि कर्मचारी शोधमोहीम तयारी करत असताना त्यांना हरिणारायन आष्टी येथे एक टाटा सुमो येणार असून त्यात सामील होण्यासाठी आणखी एक इसम येणार आहे. तसेच त्याला घेऊन २.३० ते २.४५ वाजायच्या सुमारास हरिणारायन आष्टी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकेवर दरोडा टाकणार आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून पोलिसांनी मोहिमेमधील अधिकारी, कर्माचाऱ्यांना घेऊन तीन पथके तयार केली. या पथकांना विभागत दीड वाजण्याच्या सुमारास सापळा लावण्याची सूचना करण्यात आल्या. सूचनेप्रमाणे रात्री वेळेत ठरवून दिले ठिकाणी सापळा लाऊन गुप्त बातमीदाराच्या बातमीप्रमाणे एक सुमो (गाडी क्रमांक एमएच १६आयआर ३४९५) गाडी अडीच वाजण्याच्या सुमाराला भरधाव वेगात येऊन बाजूला थांबली आणि हीच ती दरोडेखोरांची वाहनं असल्याची खात्री झाल्याने पोलिसांच्या तिन्ही पथकाला बॅटरीच्या उजेडाची ठरल्याप्रमाणे इशारा केला. तिन्ही पथकांनी वाहनासह सक्रिय होऊन त्या संशयित सुमोला विळखा घातला. त्यातील एकजण गाडीचे दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेत पळून गेला तर गट्टू मोहन काळे (अमळनेर, मध्यप्रदेश), अमित शंकर चव्हाण (सुकी अमळनेर, मध्य प्रदेश), नितीन धनसिंग पवार (टेभी पांगुळ गव्हाण), किशोर लखन पवार (जामखेड) पकडण्यात आले. दरोड्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोराजवळ एक लोखंडी रोड, एक स्क्रू ड्राईव्ह, एक ग्लुरी, एक तीक्ष्ण कटावणी, अडजस्टबल पाने, एक कट्टर, विविध रंगी सकारफ, हरिणारायनकडे बँकेचा काढलेला नकाशा सापडला. याबाबत आरोपीकडे अधिक माहिती चौकशी केली असता त्यांनी बँकेवर दरोडा घालण्याचे तयारीत असलेचे सांगितले. आष्टीचे पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली यांनी नागरिकांना गावात ग्राम संरक्षक दल कार्यान्वित करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काहीही संशय आला असेल तर आष्टी पोलीस ठाण्याला संपर्क करून कळवण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a comment