तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 June 2018

भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.


मलेशियात सुरु असलेल्या आशिया चषक टी-२० लढतीत भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा सात विकेटने दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानने दिलेले 73 धावांचे आव्हान भारतीय महिलांनी तीन गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले.  स्मृती मंधाना (38 धावा) कर्णधार हरमनप्रित कौर (नाबाद 34 धावा) आणि एकता बिष्ट  (तीन बळी) यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला लोळवले. पाकिस्तानच्या महिला संघाने प्रथम फलंदाची करताना निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्य मोबदल्यात 72 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत योग्य वेळी बळी घेतले. भारताकडून एकता बिष्टने तीन फलंदाजांना बाद करत विजयात मोलाची भूमिका बजवली. याशिवाय शिखा पांडे, अनुजा पाटील, पुनम यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.  पाकिस्तानने दिलेले 73 धावांचे आव्हान पार करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मिताली राज भोपळाही न फोडता बाद झाली. मितालीनंतर दिप्ती शर्माही शून्यावरच तंबूत परतली. यानंतर स्मृती मंधानाने (38 धावा) कर्णधार हरमनप्रित कौरच्या (नाबाद 34 धावा) साथीने भारताला विजयाच्या समीप नेले. संघाच्या 70 धावा झाल्या असताना मंधाना बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रितने भारताला सहज विजय मिळवून दिला.

No comments:

Post a Comment