मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Tuesday, 5 June 2018

मंत्रालय मुंबई बाहेर हलविण्याचा विचार!


मुंबई शहरातील वाढती गर्दी व भविष्यातील ताण लक्षात घेऊन मुंबईचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयसह काही प्रमुख कार्यालये मुंबई बाहेर हलविण्याचा विचार असल्याचे सूतोवाच नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले आहे. पंढरपूरमधील विकास कामांच्या भूमिपूजन समारंभासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली.मुंबई शहर आणि उपनगरे झपाट्याने वाढत आहेत. वाहनांची गर्दी वाढते आहे. सर्वांची रीघ एकाच दिशेने असल्याने दक्षिण मुंबईवर त्याचा मोठा ताण येतोय. भविष्यात हा ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन प्रमुख कार्यालये मुंबई बाहेर काढण्याचा शासनाचा मानस असल्याच पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचा पहिला टप्पा म्हणून नवी मुंबईच्या धर्तीवर मुंबई शहराच्या बाहेर नैना हे अद्यावत शहर वसविण्याचे काम सुरू असल्याचही त्यांनी सांगितलं.

कॅनडाची मदत गुलदस्त्यात....

कॅनडा सरकार पंढरपूर शहराच्या विकास कामांसाठी दोन हजार कोटी रुपये देणार आहेत याबाबत प्रश्न केला असता पाटील यांनी याबाबत मला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळेच नगरविकास मंत्र्यांनीच आता याबाबत हात वर केल्याने श्री विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी मोठा गजावाजा करून केलेल्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment