तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

नगरपरिषद, नगरपंचायतीच्या धनादेशावर नगराध्यक्षांची स्वाक्षरी गरजेची नाही


लातूर जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या देयकांचे प्रमाणिकरण आणि धनादेश या संदर्भातील नगराध्यक्षांचे अधिकार गोठवलेले आहेत. परंतु त्याचे पालन होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी आदेश काढून मुख्याधिकारी, लेखापाल यांना तंबी दिली आहे. नियमाचे पालन केले नाही तर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी आधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी २५ जानेवारी २०१८ रोजी आदेश काढण्यात आले होते. नगरपंचायतीच्या, नगर परिषदांच्या नगराध्यक्षांचे मुख्याधिकारी व नगरपंचायत, नगरपरिषद यांच्यावरील वित्तीयव कार्यकारी नियंत्रण संपुष्टात आलेले आहे. देयक प्रमाणक, धनादेश यावर नगराध्यक्षांची स्वाक्षरी घेणे आवश्यक नाही. परंतू लातूर जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या, नगरपालीकेच्या मुख्याधिकारी, लेखापाल यांच्याकडून त्याची अंमलबजावणी होत नव्हती.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले. नियमांचे पालन नाही केले तर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे. या आदेशामुळे चांगली खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment