तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

आ बोंद्रेनी केली बॅक अधिकाऱ्याची कान उघाडनी

 महाराष्ट्र बॅकने ११ शेतकऱ्यानाच कर्ज वाटप केल्या बद्दल आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात संबंधीत व्यवस्थापकाचा हार घालुन अनोखा स्वागत  
 संग्रामपुर [ प्रतिनिधी] संग्रामपुर येथे तालुका काँग्रेस च्या  प्रमुख पक्ष पदाधिकारी यांची  जिल्हाध्यक्ष आ राहुल बोद्रे यांच्या मार्गदर्शनात  पक्षनिधी जमा करण्या संदर्भात आढावा घेण्यात आला  त्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बँकेच्या अधिकार्यांना जाब विचाण्यात आला प्रथम राहुल बोंद्रे याच्या नेतृत्व भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेवर मोर्चा नेण्यात आला या वेळी स्टेट बॅकेने कर्ज वाटपच केले नसल्याचे समोर आले तर महाराष्ट्र बॅकेने ११ शेतकऱ्याना कर्ज वाटप केल्या बद्दल राहुल बोंद्रे नी शेतकऱ्यांच्या प्रश्नांन विषयांवर  अधीकार्यांना धारेवर धरले व महाराष्ट्र बॅक व्यवस्थापक यांनी ११ शेतकऱ्याना कर्ज वाटप केल्या बद्दल आ बोंद्रे यांच्या नेतृत्वात अहिसेचा मार्गाचा अवलंब करित अनोख्या पदद्धतीने माजी जि प अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी महाराष्ट बॅकेचे मुजोर व्यवस्थापक यांना हार घालुन स्वागत करण्यात आले   त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांन शी संवाध साधत पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पेज प्रमुख करण्या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले.राज्यातील व केंद्रातील देवेंद्र व नरेंद्र च्या शेतकरी विरोधी धोरणांनवर कडाडून टिका केली.भाजपा जवळ प्रचंड पैसा असुन ते त्या जोरावर निवडणूका जिंकत आहोत. जिल्ह्यात पक्षनिधी उभा करण्याच्या संबधात त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले व त्याच्या आव्हानास साद देत संग्रामपुर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जवळपास दिड लाख रुपये पक्ष निधी रककम सुपुर्त केली व अपेक्षीत निधी गोळा करण्याचे आश्वान दिले.यावेळी संग्रामपुर तालुका काँग्रेसच्या कामाचे कौतुक आ  राहुल बोंद्रे नी केले तसेच संग्रामपुर नगर पंचायत च्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी रामविजय बुरुंगले,प्रकाश पाटील, स्वतीताई वाकेकर, सतिश महेंद्रे,नानु सेठ,रशीद खा,राजेंद्र वानखडे,तेजराव मारोडे, प्रकाश देशमुख, संजय ढगे,हरीभाऊ राजनकर,मिनाक्षी ताई हागे, टाकळकर ताई, पठाण सर,अविनाश उमरकर,संतोष राजनकर,अकबर सेठ,श्रीकृष्ण दाभाडे,श्रीकृष्ण तराळे,पांडव सर जगन्नाथ विश्वकर्मा,अमोल घोडेस्वार,यशवंतराव दाणे,स्वप्निल देशमुख,राजु राठोड, मनोहर बोराखडे संतोष टापरे,शे.अफरोज व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:

Post a Comment