तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

जगातल्या सगळ्यात विचित्र माणसाची चमत्कारीक बातमी.


जगभरात काही विचित्र माणसं पाहायला मिळतात. ज्यांचे किस्से ऐकल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसतो. साधारण: सर्व सामान्य माणसं उन्हाळ्यात गरमीमुळे हैराण होतात. तर हिवाळ्यात थंडीच्या दिवसात त्यांना हुडहुडी भरते. मात्र हरियाणामध्ये असा एक अजबमाणूस समोर आला आहे ज्याला उन्हाळ्यात थंडी वाजते तर हिवाळ्यात गरम होतं. संतराम असं या व्यक्तीचं नाव असून ते हरियाणातील महेंद्रगडचे रहिवासी आहेत. संतराम यांना उन्हाळ्यात थंडी वाजत असल्याने ते पांघरुण घेऊन झोपतात. तर भर दुपारी प्रचंड गरम होत असताना शेकोटी करून बसतात. तसेच गावकऱ्यांनी संतराम हे हिवाळ्यात आईसस्क्रिम खातात. तर कधी कधी खूपथंडी असताना देखील पहाटे तलावात जाऊन आंघोळ करत असल्याच सांगितलं.संतराम यांचा हा त्रास काही नवा नसून त्यांना लहानपणापासूनच अशा स्वरुपाचा आजार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. तसेच हा आजार समजण्यासाठी त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्याही करण्यात आल्या. मात्र त्यातून काहीच स्पष्ट झाले नाही. त्यामुळेच डॉक्टरांनी संतराम यांच्यासोबत जे काही होतआहे ते निसर्गाची देण असल्याचं म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment