तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

तुमची शुर्पणखा करू, भाजपच्या महिला शिक्षणमंत्र्यांना धमकी.


राजपूत समाजाच्या लोकांची तुलना उंदरांशी केल्याच्या कथित प्रकरणामुळे राजस्थानच्या शिक्षण मंत्री किरण माहेश्वरी या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्या कथित विधानामुळे ‘श्री राजपूत करणी सेना’ने किरण माहेश्वरी यांना राजपूतांची माफी मागा, नाही तर नाक आणि कान कापून टाकू, अशी धमकी दिली आहे. तर विरोधी पक्षांनी देखील माहेश्वरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सोमवारी एका कार्यक्रमात माहेश्वरी यांना पत्रकारांनी भाजपच्या विरोधात राजस्थानमध्ये सुरू असलेल्या विरोधक आणि राजपूत संघर्ष समितीच्या अभियाना संदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘अशी काही लोकं आहेत जे पावसाळ्यातील उंदरांसारखे आहेत… निवडणुका आल्या की ते बिळातून बाहेर येतात…’ वसुंधरा राजे सरकारच्या कॅबिनेट मिनिस्टरच्या या विधानानंतर करणी सेनेने जयपूरमध्ये बैठक बोलवली. त्यामध्ये माहेश्वरी यांनी माफी न मागितल्यास त्यांचे नाक, कान कापून काढू असा इशारा देण्यात आला.

No comments:

Post a Comment