मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 6 June 2018

आज मंत्रालयात शिक्षक संघाची बैठक विविध प्रश्न्नावर प्रदीर्घ चर्चा

बाळू राऊत
मुंबई : आज मंत्रालयामध्ये चंद्रकांत दादा पाटील, महसूल व बांधकाम मंत्री यांनी प्राथमिक शिक्षकांच्याप्रश्नाबद्दल मंत्रालयामध्ये बांधकाम भवन, ७वा मजला मुंबई येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शि्क्षक संघाची बैठक बोलावली होती.या बैठकीला शिक्षक संघाचे नेते मा. आ. शिवाजीराव पाटील, राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, समन्वय समितीचे नेते मोहन भोसले,  पूणे विभागीय अध्यक्ष माधवराव पाटील, राज्य सरचिटणीस केशव जाधव, जिल्हा अध्यक्ष संभाजी बापट, राज्य सल्लागार वसंतराव हारुगडे, राज्यातील संघाचे जिल्हा, महानगर पालिका,तालुका अध्यक्ष व संघाचे पदाधिकारी,  कोल्हापूर शिक्षक बँकेचे चेअरमन मा.शिवाजी पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी शिक्षकांचे पुढील ज्वलंत प्रश्नावर चर्चा झाली.
जूनी पेंशन बाबत शासनाने फेरविचार करावा. व जूनी पेंशन लागू करावी.
बदलीमध्ये विस्थापित झालेल्या शिक्षकांना समानीकरण मधील शाळा पोर्टलवर उपलब्ध करून देऊन पोर्टल नवीन भरण्यास परवानगी द्यावी.यापुढे तालुक्यातच बदल्या व्हाव्यात.ms-cit ची मुदत वाढवावी.
२३.१०.२०१७च्या शासन आदेशातील वरिष्ठ व निवड श्रेणीसाठीची शाळा 'अ ' श्रेणीत शाळा असावी ही अट काढून टाकावी.
विषय शिक्षकांना पदविधराची वेतनश्रेणी मिळावी.
नगरपालिका, महानगर पालिका शिक्षकांचे पगार जिल्हा परीषद शिक्षक प्रमाणे शासनाच्या १00 % अनुदानातून व्हावेत.
शिक्षकांना पोलीस गुन्ह्यामध्ये साक्षीदार  करु नये.
जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे वेतनवाढी लागू कराव्यात.
अनट्रेण्ड सेवानिवृत्त शिक्षकांना पेंशन मिळवी.
या व इतर मागण्या सोडवण्यासाठी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळासोबत मा .ना. देवेंद्रजी फडणवीस. मुख्यमंत्री , मा.ना. विनोदजी तावडे, शिक्षणमंत्री, मा.ना. पंकजाताई मुंडे, व आपण या सर्वांचे समवेत बैठक व्हावी अशी मागणी शिक्षक संघाचे नेते मा. आ. शिवाजीराव पाटील यांनी केली.
मा.ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित संघाच्या अध्यक्षांना आपले प्रश्न मांडण्याची मुभा दिली. यावेळी अध्यक्षांनी आपल्या जिल्हयातील विविध प्रश्न मांडले. सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा केली. व १५तारखेच्या आत मा.ना. मुख्यमंत्री व इतर मंत्री महोदया सोबत शिक्षक संघाच बैठक घेण्याचे अभिवचन दिले.
या नंतर मा.ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्व उपास्थितांना मंत्रालयातच भोजन दिले.यावेळी राजाराम वरुटे, मोहन भोसले, केशव जाधव, संभाजी बापट यांची मनोगते झाली.

No comments:

Post a Comment