तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

शिक्षण क्षेत्रात निर्माणझालेल्या स्पर्धेच्या युगात टिकण्या साठी ध्येयनिश्चिती आवश्यक-अॅड किरणराव सरनाईक

महेंद्रकुमार महाजन

रिसोड:-गोरगरीबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणणे या उदात्त हेतूने प्रेरित होऊनच श्री शिवाजी शिक्षण संस्था वाटचाल करीत असून शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत असताना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड्. किरणराव सरनाईक यांनी केले.

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन दि. ११ जुन २०१८ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशीमचे अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये
श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशीमचे सचिव भिकाजीराव नागरे, स्थानिक शाळा समिती सदस्य जितेंद्रकुमार दलाल, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्रसिंह दिनोरिया,उपप्राचार्य ए.एन.देशमुख,उपमुख्याध्यापक शंकरराव लादे तसेच वाशिम येथुन आलेले प्रा.आशिष सोळंके हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.यानंतर अध्यक्ष तथा प्रमुख अतिथींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,तसेच इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शिल्ड, प्रमानपत्र,भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलतांना किरणराव सरनाईक म्हणाले की, दहावीत असतानाच विद्यार्थ्यांनी त्यांचे ध्येय निश्चित करून पुढील शिक्षणाची वाटचाल करावी कारण बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते.श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये विशेषता बहुजन विद्यार्थी शिकत असतात या बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच बारावीनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी द्याव्या लागणाऱ्या नीट व जेईई सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने करता येऊ शकते यासाठी विशेष प्रयत्न संस्थेच्या मार्फत केले जात असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी सत्कार केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमधून श्री विष्णू सारडा यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसे सत्कार केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंद सारडा व कु.स्वप्ना काळे या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली.
बारावीनंतर द्यावयाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कशाप्रकारे दालन उपलब्ध करून दिल्या जात आहे याची माहिती प्रा. सोळंके यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य धर्मेंद्रसिंह दिनोरिया यांनी केले आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या या यशासाठी शाळेच्या माध्यमातून कशाप्रकारे तयारी करून घेतली याबद्दल तसेच शाळेच्या निकालाचा उंचावलेला आलेख कशाप्रकारे पुढे वाढत गेला याबद्दल माहिती पालकांना दिली.
कार्यक्रमाचे संचलन अशोकराव देशमुख यांनी केले तर आभार मो.आरिफ यांनी मानले. यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले .

.महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड

No comments:

Post a Comment