तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 June 2018

पाथरी तहसीलदारांना कॅबिन मध्ये निराधार महिलांनी घेरले;सकाळी दहा पासून आंदोलन सुरूच

प्रतिनिधी
पाथरी:-येथील तहसिलदारांना निराधारांचे अर्ज निकाली काढा आणि इतर मागण्यां साठी महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वात सकाळी दहा वाजल्या पासुन घेराओ घालण्यात आला असून महिलांनी कामकाज बंद पाडले आहे.तहसिल दारांच्या कॅबिन मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
१ जुन रोजी शेतकरी कर्जमाफी, निराधारांचे अर्ज निकाली काढा आणि अन्य मागण्या साठी किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयाला किसान सभेच्या नेतृत्वात घेराओ आंदोलन करण्यात आले होते. या वेळी या आंदेलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या या वेळी तहसीलदारांनी सात तारखे पर्यंत सर्व अर्ज निकाली काढतो असे लेखी दिल्याचे कॉ दिपक लिपने यांनी सांगितले मात्र या कालावधित या विषयी बैठक न झाल्याने शुक्रवार ८ जुन रोजी तालुक्याती महिलांनी सकाळी दहावाजल्या पासून येथिल तहसील कार्यालयात किसान सभेचे कॉ दिपक लिपने यांच्या नेतृत्वात तहसीलदारांच्या दालनात महिलांनी ठिय्या मांडून घेराओ घातला असून या ठिकाणी पेलीस बंदेबस्त वाढवण्यात आला आहे दरम्यान प्रकरण निकाली काढल्या शिवाय तहसील कार्यालयातून ऊठणार नसल्याचे महिला ठाम पणे सांगत असल्याने काम काज ठप्प झाले आहे.

No comments:

Post a Comment