तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 June 2018

रयतेच्या भल्या साठी अहिल्या देवी तत्पर असत-जुनेद खान दुर्रांनी

प्रतिनिधी
पाथरी:-राज्याचा कारभार करीत असताना नेहमी सामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून अहिल्याबाई वागत असत. अपंग व असहाय्य लोकांचे पुनर्वसन, गोरगरिबांसाठी अन्नछत्रे, वस्त्रे यांचे वाटप असे जनहित कार्यक्रम त्यांनी त्यांच्या राज्यात राबवले. रयतेच्या भल्यासाठी कितीही मोठी किमंत मोजण्यास त्या तत्पर असत. उद्योग धंद्याना चालना देण्यासाठी विणकर, कारागीर, कलावंत, साहित्यिक या सर्वांच्या विकासाचे धोरण ठरविले. त्यांना सुखसोयी पुरविल्या. परिणामी राज्याची औद्योगिक व आर्थिक प्रगती झाली. त्यांच्या या सर्व कामगिरीमध्ये सासरे राजर्षि मल्हारराव होळकर यांच्या संस्काराची व विचारांची साथ त्यांना खंबीरपणे होती असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा राकाँचे पाथरी न प तील गट नेते जुनेद खान दुर्रांनी यांनी ९ जुन शनिवार रोजी अहिल्यादेवी होळकर यांची २९३वी जयंती निमित्ताने अहिल्यानगर येथील धनगर बांधवांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमा वेळी बोलतांना व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक अलोक चौधरी, शेख इरफान, गोविंद हारकाळ, नसिरुद्दीन सिद्दीकी, डॉ.जगदीश शिंदे साहेब, पो.ऊ.नि देवकते साहेब, पं स सदस्य शरद कोल्हे, युवा सेना शहराध्यक्ष प्रमोद चाफेकर,नारायणराव पितळे, शिवाजी पितळे,इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, अहिल्यादेवीचा  राज्यकारभार प्रजाहितदक्ष, समर्पित वृती अन्यायाची चीड, अबलांचे रक्षण, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, दृष्टांना शासन व गुणवंतांना आसन अशा प्रमुख तत्वांवर आधारित होता. त्यांचे प्रेरणादायी बहुजन हिताय कार्य बहुजन समाजापुढे आणून त्याचा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे असे ते या वेळी बोलतांना म्हणाले. या नंतर राजमाता अहिल्यादेवीच्या प्रतिमेची पाथरी शहरातील राष्ट्रीय महामर्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

No comments:

Post a Comment