तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 June 2018

टूकूर प्रकल्पाचे काम ज्यांनी थांबवले त्यांनाच निवेदन....!

जनतेची दिशाभूल करू नका- राजेंद्र राऊत

बीड दि.10 (प्रतिनिधी)ः- अंथरवणपिंप्री येथील टूकूर प्रकल्पाचे काम ज्यांनी थांबवले त्यांनाच ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देवून काम करण्याची मागणी करणे म्हणजे जनतेची दिशाभूल केली जात असून हा प्रकल्प व्हावा यासाठी आ.जयदत्त क्षीरसागर प्रयत्नशिल असून लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याचे राजेंद्र राऊत यांनी सांगितले आहे.

बीड तालुक्यातील अंथरवणपिंप्री जवळ टूकूर प्रकल्प व्हावा यासाठी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी पालकमंत्री असतांनाच या प्रकल्पाची वर्कऑर्डर काढली त्यानंतर त्याची निविदा प्रक्रीया पुर्ण करण्यात आली या प्रकल्पासाठी आ.क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षापासून सातत्यांने पाठपुरावा करून हा प्रश्‍न मार्गी लावला आहे.  हा प्रकल्प झाला तर परिसरातील चाळीस गावातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्‍न मिटणार आहे. याबाबत आ.जयदत्त क्षीरसागर यांनी अधिवेशन काळात सभागृहात या प्रकल्पाची मागणी लावून धरली त्यामुळे याचे काम आता मार्गी लागत आहे. असे असतांना निविदा प्रक्रीया झाल्यानंतर संबंधीत खात्याचे अधिकारी जेव्हा मोजणीसाठी गेले होते तेव्हा आ.विनायक मेटे यांनी पाठबंधारे मंत्री यांच्यावर दबाव टाकून मोजणी थांबवली ज्यांनी या प्रकल्पाचे काम थांबविले त्यांनाच निवेदन दिल्याचे माध्यमातून वाचण्यात आले. हा प्रकार जनतेची दिशाभूल करणारा असून ग्रामस्थांनी अशा फसव्या पत्रकबाजीवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन राजेंद्र राऊत यांनी पत्रकाव्दारे केले आहे. 

No comments:

Post a Comment