तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

आजपासून रंगणार विश्वचषक थरार, फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला.


गुरुवारी होणाऱ्या रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याद्वारे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या महासंग्रामाला सुरुवात होईल. तब्बल महिनाभर रंगणा-या या फुटबॉल ‘वर्ल्ड वॉर’मध्ये बाजी मारण्यात तब्बल ३२ संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. गुरुवारी दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर यंदाच्या २१व्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या थराराला सुरुवात होईल.काही तासांवर आलेली विश्वचषक स्पर्धा संस्मरणीय करण्यासाठी यजमान रशिया पूर्णपणे फुटबॉलमय झाले असूनज्या शहरांमध्ये सामने रंगणार आहेत तेथे फुटबॉल प्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. रशियातीलसर्वच ११ यजमान शहरांमध्ये चाहत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. एक महिना रंगणाºया या फुटबॉल मेळावाचा पहिला सामना ६० हजार प्रेक्षक क्षमतेच्या लुजनिकी स्टेडियममध्ये खेळविण्यात येईल. यावेळी यजमान रशिया सौदी अरबविरुद्ध दोन हात करेल. त्याचवेळी रशियन नागरिक मोठ्या उत्साहामध्ये विदेशी पाठिराखे आणि पर्यटकांचे स्वागत करत आहेत. एक आठवड्यापूर्वीच दक्षिण अमेरिकेच्या पाठिराख्यांनी एकत्रितपणे रेड स्केअर परिसतात फेरी काढली आणि येथील दुकानदारांसह फोटोही काढले. यावेळी, काही स्थानिक लोकांनी सकारात्मकपणे सर्वांना पाठिंबा देत ‘रुस रुस’असा नाराही दिला. त्याच वेळी मॉस्कोच्या बाहेर दुसºया शहरांमध्ये हाच उत्साह अधिक दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment