तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Tuesday, 5 June 2018

महामुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर.


काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या महामुलाखतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होईल. तर शरद पवार आणि राज ठाकरे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असतील. तर 15 जूनला होणाऱ्या संमेलनाच्या समारोपाला उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून आयोजकांनी महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना आणि रंगकर्मींना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. तर प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य करत मुलुंडच्या ९८व्या नाट्यसंमेलनाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे आता नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय फटकेबाजी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment