तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

स्मृती इराणी यांना नीती आयोगावरुनही हटवले


केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना आणखी एक धक्का देण्यात आला असून, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियावरून (नीती आयोग) त्यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना विशेष आमंत्रित सदस्यपद देण्यात येणार आहे.कॅबिनेट सचिवालयाने एक पत्रक काढले असून, त्यात नीती आयोगात बदल करण्यात आल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनीही या बदलास मंजुरी दिल्याचे त्यात नमूद आहे. डॉ. राजीव कुमार हे आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. मनुष्यबळ विकास मंत्री झाल्यानंतर स्मृती इराणी यांना नीती आयोगावर सदस्य म्हणून घेण्यात आले होते. पुढे त्यांचे मंत्रालय बदलण्यात आले. त्या वस्त्रोद्योगमंत्री झाल्या तरीहीआयोगावर विशेष सदस्य म्हणून त्या होत्या. मात्र, आता या पदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याआधी १५ मे २०१८ रोजी स्मृती यांच्याकडून माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय काढून घेण्यात आले होते. या बदलास महिना उलटत नाही तोच त्यांचे आणखी एक पद काढून घेण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment