तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

वादळी वारे आणि पावसात केळीचे पीक उधवस्त;चार लाखाचे नुकसान

प्रतिनिधी

पाथरी:-रविवारी सायंकाळच्या सुमारास पाथरी तालुक्यात वादळी वा-या सह झालेल्या पावसात बोरगव्हाण येथी शेतक-याचे हाता तोंडाशी आलेले केळीचे पीक जमिनदोस्त होऊन या शेतक-याचे चारलक्ष रुपयांचे नुकसान झाल्याने या पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे सोमवारी निवेदना व्दारे केली आहे.
तालुक्यातील बोरगव्हाण येथील अत्यल्पभूधारक असलेले साहेबराव सुर्यभान खुडे यांना गट नं १६८ मध्ये केवळ एक एक्कर जमिन असून या जमिनीत त्यांनी केळीची लागवड केली होती. वर्षभर जोपासणा केलेल्या या केळीला घड ही चांगलेच लगडले होते मात्र रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारे आणि पाऊस झाल्याने यात साहेबराव खुडे यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला असुन संपुर्ण केळीची बाग जमिनदोस्त झाल्याने यातून मिळणारे चार लाखाचे उत्पादन हातचे गेल्याने या पिकासाठी करावा लागलेल्या खर्चाच्या कर्जाचा डोंगर मात्र या शेतक-याच्या डोक्यावर राहीला असून या विषसयी साहेबराव खुडे यांनी तालुका कृषी अधिकारी,उपविभागिय अधिकारी, आणि तहसीलदारांना निवेदन देऊन या पिकाची पाहाणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment