तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Thursday, 14 June 2018

पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार.


भारतीय मुलीची लग्नानंतर फसवणूक करुन परदेशात निघून जाणाऱ्या एनआरआय लखोबांना आता सरकारने चांगलाच दणका द्यायचे ठरवले आहे. कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष करून परदेशात निवांत जगणाऱ्या या नवरोबांचे पासपोर्ट रद्द करण्याचा व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. भारतामध्ये विशेषतः पंजाबमध्ये अनेक महिलांची या एनआरआय नवऱ्यांनी फसवणूक केली आहे. उच्चप्रतीच्या जीवनपद्धतीचे आमिष दाखवून मुलींशी लग्न करायचे आणि काही काळानंतर त्यांना भारतातच सोडून जायचे किंवा परदेशात त्यांचा छळ करायचा असे प्रकार या लोकांकडून घडले आहेत. या महिलांना दिलासा देण्यासाठी भारतातील मंत्र्यांच्या गटाने काही नवे उपाय सुचवले आहेत. त्यामध्येच पारपत्र रद्द करणे, संपत्ती जप्त करणे अशा सूचनांचा समावेश आहे. मंत्रिगटाने सुचवलेल्या उपायांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रकरणे हाताळण्यासाठी तसेच कोर्टाच्या समन्सला दखल न घेणाऱ्या नवऱ्यांची प्रकरणे पाहाणारे वेगळे संकेतस्थळ तयार करावे अशा सूचनेचाही समावेश आहे. जर समन्सला उत्तर देण्यास नवऱ्याने नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जे लोक महिलांना फसवून परदेशात जातात, तिकडे नाव बदलून राहातात त्यांच्या संदर्भातील प्रकरणेही या संकेतस्थळावर हाताळली जातील. एनआरआय नवऱ्याशी लग्न केल्यावर त्याची नोंदणी 48 तासांच्या आत करण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. या मंत्रिगटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला बालकल्याण विकास मंत्रीमेनका गांधी, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री आहेत. राजनाथ सिंह यांनी या मंत्रिगटाचे नेतृत्त्व केले.

No comments:

Post a Comment