तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

अटल बिहारी वाजपेयी यांना लवकरच मिळणार डिस्चार्ज.


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याने लवकरच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने बुधवारी दुपारी जाहीर केलेल्या वैद्यकीय बुलेटीननुसार अटल बिहारी वाजपेयी हे औषधोपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती पहील्या पेक्षा कितीतरी चांगली असून त्यांना आता आराम वाटत आहे.अटलबिहारी वाजपेयी यांना सोमवार ११ जून रोजी दुपारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे(एम्स)त दाखल करण्यात आले होते. स्मृतिभंश, मूत्रसंसर्ग तसेच किडनीविकारामुळे त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. रूग्णालयात त्यांच्यावर डायलिसिसही करण्यात आले होते. गेल्या ४८ तासात त्यांच्या तब्येतीत फारच सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. त्यांची किडनीही उत्तमरित्या काम करीत आहे. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही सामान्य असल्याने लवकरच त्यांना घरी पाठवण्याची परवानगी देण्यात येईल, असा आशावाद वैद्यकीय बुलेटीनमध्ये व्यक्त करण्यात आला.‘एम्स’चे संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम वाजपेयी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. त्यांना ‘आयसीयू’मध्ये ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजप अध्यक्ष अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आदींनी ‘एम्स’मध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

No comments:

Post a Comment