तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पीएचडी बंधनकारक.


विद्यापीठांमध्ये असिस्टंट  प्रोफेसर अर्थात सहाय्यक प्राध्यापकपदासाठी पीएचडी बंधनकारक करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केलीय. तीन वर्षांनंतर हा नियम लागू होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून हा नियम लागू होणार आहे. आतापर्यंत सहाय्यक प्राध्यापकांना फक्त राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट द्यावी लागायची. आता तीन वर्षांनी मात्र डॉक्टर झाल्यावरच प्राध्यापक होता येणार आहे.त्याचबरोबर विद्यापीठातली परफॉर्मेंस बेस्ड अप्रेजल सिस्टीम म्हणजेच कामगिरीवर आधारित गुणांकन पद्धत बंद करुन ग्रेडिंग म्हणजेच श्रेणी पद्धत लागू करण्यात आलीय.

No comments:

Post a Comment