तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Monday, 11 June 2018

पुरुषोत्तमपुरीत भाविकांची नौका उलटली; सुदैवाने जीवित हानी टळली.


माजलगाव - अधिकमासनिमित्त देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असलेल्या पुरुषोत्तपुरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नौका सोमवारी सकाळी १० वाजता गोदावरी नदीत उलटली. प्रसंगावधान राखून बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी, ग्रामस्थांनी वेळीच नदीत उड्या घेऊन भाविकांचे प्राण वाचविल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. विनापरवाना चालणाऱ्या नौका बंद करण्याची मागणी ग्रामास्थातून होत आहे.दर तीन वर्षानंतर येणाऱ्या अधिकमासात भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे मोठे महत्व आहे. देशात एकमेव मंदिर असलेल्या पुरुषोत्तमपुरीत सध्या भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जालना, परभणी जिल्ह्यातील अनेक भाविक नौका, कलही, बोटीतून गोदावारीनदी पार करून पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येतात. सोमवारी दि. ११ सकाळी १० वाजता परतूर तालुक्यातील रेवलगाव, रामनगर येथील २८ भाविक एका बोटीतून दर्शनाला येत होते. बोट नदीपात्रात असताना अचानक उलटल्याने सर्व भाविक नदीपात्रातील पाण्यात पडले. काठावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पाण्यात उद्या घेऊन काही महिला भाविकांचे प्राण वाचविल्याने मोठी जीवितहाणी टळली. सर्व भाविकांना पाण्याच्या बाहेर काढून तत्काळ पुरुषोत्तमपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

बोट उलटून जखमी झालेले भाविक ...

मंदाकिनी सुरवसे, शालन सुरवसे, गंगाराम लहाने, सविता घायाळ, अश्विनी घायाळ, चंद्रकला घायाळ, प्रयागबाई चव्हाण, इंदुबाई घायाळ, अशामती लहाने, राजाभाऊ घायाळ, बाळासाहेब भुंबर, सावित्रा घायाळ, इंदुबाई घायाळ, विजयमाला भुंबर, गीता कांबळे, मुक्ता लहाने, उमा घायाळ, गंगुबाई सुरवसे, अरुणा घायाळ, सुदामती साकळकर, मीरा मोगल, वच्छलाबाई शिंदे, संगीता थेटे, अनिता पवार, प्रियंका पवार, अभिषेक थेटे, गणेश थेटे, प्रांजल पवार (सर्व राहणार रेवलगाव, रामनगर तालुका परतूर जिल्हा जालना.

No comments:

Post a Comment