तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

साळवे नंतर आणखी पाच जणांनी केली लिंग बदलाची मागणी


बीड मधील हवालदार ललिता साळवे यांच्या लिंग बदलानंतर ते ललित साळवे झाले असून अशाच प्रकारचे लिंग बदला संदर्भात आणखी पाच जणांनी विनंतीवजा मागणी सेंट जॉर्ज रुग्णालयमध्ये केली आहे.ललिता साळवे यांच्यावर झालेल्या लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतर ५ जणांनी आपल्यालाही लिंग बदल करायचा आहे अशी विनंती वजा मागणी रुग्णालयाकडे केली असल्याची माहिती डॉ. कपूर यांनी दिली आहे. यापाच जणांमध्ये ४ महिलांचा व एका पुरुषाचा समावेश आहे. मुख्य म्हणजे यातील दोन लोकांनी डॉक्टरांना भेटून याबद्दल अधिक माहिती व समुपदेशन घेतले आहे. तसेच लिंग बदलाची तयारी दर्शवल्याचेही ललितचे डॉक्टर तसेच प्लास्टिक सर्जन रजत कपूर यांनी सांगितले.लिंग बदलासाठी लहान व मोठ्या अनेक सर्जरी कराव्या लागतात ज्यामध्ये साधारण २ वर्षाचा कालावधी लागतो. तर जवळपास सहा महिन्यांचा कालावधी हा फक्त समुपदेशनासाठीचा असतो. या विषयी अधिक माहिती देताना डॉ. कपूर म्हणाले, ‘ललितमुळे आपण अधिक लोकांना मदत करू शकतो असा विश्वास निर्माण झाला आहे. सेंट जॉर्ज रुग्णालय नंतर बी.एम.सी (मुंबई महानगर पालिका )च्या सायन रुग्णालयामध्येही लिंग बदली प्रकारचे २१ पुरुष ते महिला व सात महिला ते पुरुष अळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.’‘आपल्या समजात अजून अशा गोष्टींना कुचेष्टेच्या नजरेनेच बघितले जाते. याचाच प्रत्यक्ष मागील ऑगस्टमध्ये आला, जेव्हा सुकन्या कृष्णा आणि अर्णव यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली. त्यांनी त्यांचे अनुभव एका व्हिडीओद्वारे मांडले होते. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला लिंगबदलाबाबत अनेक विचारणा होऊ लागल्या आहेत’, असं या दोघांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ.संजय पांडे यांनी सांगितलं. तसेच हा व्हिडिओ जवळपास १७,००० लोकांनी हा बघितला आहे. हिंदुस्थानात लिंगबदलाची शस्त्रक्रिया ही महागडी असून अशा शस्त्रक्रियांसाठी किमान ६ लाख रूपयांचा खर्च येऊ शकतो असं पांडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment