तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला अटक.


गर्लफ्रेंड निरू रंधावा हिला मारहाण केल्याप्रकरणी अखेर अभिनेता अरमान कोहलीला अटक करण्यात आली आहे. लोणावळा येथून त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून त्याला पोलिसांनी अटककेली. गेल्या रविवारी अरमान विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अरमानने केलेल्या मारहाणीत निरु रंधावाला गंभीर इजा झाली असून उपचारासाठी तिला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघेही २०१५ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.निरुने तक्रार दाखल केल्यापासून अरमान फरार होता. चौकशीसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याच्या वडिलांशीही पोलिसांनी संपर्क साधला असता आपल्याला काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर लोणावळा येथून मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.एका क्षुल्लक गोष्टीवरून अरमान आणि निरुमध्ये भांडण झाले होते आणि त्यानंतर रागाच्या भरात अरमानने तिला बेदम मारहाण केली होती.

No comments:

Post a Comment