तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश अंगीकारल्यास जीवनात निश्‍चित बदल घडतो - उपजिल्हाधिकारी महादेव किरवले


परळी (प्रतिनिधी) ः विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा संदेश अंगीकारल्यास जीवनात निश्‍चित बदल घडतो असे प्रतिपादन नुकतीच उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झालेले महादेव किरवले यांनी केले. कौठळी येथे दि. 2 जून गावकर्‍यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार सोहळयात ते बोलत होते.

कौठळी येथे झालेल्या उपजिल्हाधिकारी महादेव किरवले व समाधान किरवले यांची कौशल्य विकास अधिकारी, रोजगार व उद्योजक विभाग, राहुल साळवे यांनी बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला. परळी तालुक्यातील भुमीपुत्र महादेव किरवले यांचा आदर्श समाजातील तरूणांनी घ्यावा. या भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौठळीचे सरपंच मधुकर झिंर्जुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून  माजी सरपंच भीमराव हाके, माजी सरपंच साहेबराव चव्हाण, फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे, चंद्रकांत कोकरे, सर्जेराव पोले, व्यंकटी नाणेकर, उमाकांत काटे, सोनबा चौधरी, बंडू शेळके, आश्रुबा किरवले, अशोक गायकवाड, बबन नागमोडे, अशोक हाके, सतीश हाके, कौठळी सोसायटी सदस्य संपत झिंर्जुडे, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र झिंर्जुडे, भास्कर झिंर्जुडे, भारतीय बौध्द महासभेचे राज्य युवक संघटक विवेक झिंर्जुडे, तालुकाध्यक्ष ब्रम्हानंद कांबळे, प्रा. दशरथ रोडे, अनिल झिंर्जुडे, डॉ. राम झिंजुर्डे, बारा बलुतेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर पांचाळ यांच्यासह गावातील महिला व पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment