तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

शिवशाही बसमध्ये दिव्यांगांना सवलत मिळावी यासाठी धंनजय मुंडेंनी घेतली दिवाकर रावतेंची भेट - डॉ. संतोष मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) नुकतेच राज्य परिवहन महामंडळास सत्तर वर्षे झाली. यानिमित्त जेष्ठ नागरिकांसाठी महामंडळाने शिवशाही बसमध्ये भाडे सवलत घोषीत केली आहे. याच अनुषंगाने दिव्यांगांना भाड्यात सवलत मिळावी तसेच त्यांना काही जागा आरक्षित असाव्यात या मागणीसाठी विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेदेखील उपस्थित होते. याविषयी सरकार सकारात्मक असल्याची माहिती डॉ. संतोष मुंडेंनी दिली आहे.

दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ व सन २०१६ चा सुधारित कायदा (आर. पी. डब्लू. डी.) केंद्र व राज्य सरकार राबवित आहे. या कायद्यान्वये महाराष्ट्रातील सुमारे २९ लाख दिव्यांग व्यक्तींना फायदा होऊ शकतो. त्यामुळे या कायद्यान्वये दिव्यांगांना शिवशाही बसमध्ये भाड्यात सवलत मिळावी तसेच त्यांना काही जागा आरक्षित असाव्यात या मागणीसाठी विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची आज मुंबई येथे भेट घेतली, विशेष म्हणजे सरकार याचा सकरात्मक विचार करेल असे आश्वासन दिवाकर रावतेंनी दिले अशी माहिती डॉ. संतोष मुंडेंनी दिली.

No comments:

Post a Comment