तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

भय्युजी महाराजांना गोपीनाथ गडावर सर्व पक्षीय नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबतच्या स्नेहसंबंधांना दिला अनेकांनी उजाळा

परळी दि. १४ ----  राष्ट्रसंत भय्युजी महाराजांनी अनेकांचे संसार उभे केले, गोरगरीब आणि शेतकर्‍यांना मोठा आधार देण्याचे काम केले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कुटुंबियांशी त्यांचा कौटूंबिक स्नेह होता या व अशा अनेक आठवणींना उजाळा देत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आज गोपीनाथ गडावर त्यांना भावपूर्ण  श्रद्धांजली अर्पण केली.

     राष्ट्रसंत भय्युजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोपीनाथ गडावर आज सर्व पक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भय्युजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश देशमुख,  रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे, शिवसेना तालुकाप्रमुख वैजनाथ सोळंके, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर पौळ, पत्रकार संजय खाकरे, अॅड. अरूण पाठक आदींनी आपल्या भावना व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

      यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, जेष्ठ नेते विकासराव डुबे, वैजनाथ जगतकर, युवानेते रामेश्वर मुंडे, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक सर्वश्री श्रीहरी मुंडे, ज्ञानोबा मुंडे, भाऊसाहेब घोडके,  आश्रोबा काळे, दत्तात्रय देशमुख, त्र्यंबक तांबडे, परमेश्वर फड, व्यंकट कराड, वैद्यनाथ बँकेचे संचालक रमेश कराड, तसेच वृक्षराज निर्मळ, सुरेश गिरडे, भिमराव मुंडे, मोहनराव आचार्य, योगेश मेनकुदळे, सुरेश माने, वसंत राठोड, पत्रकार धनंजय आरबुने, मोहन व्हावळे, दत्ता काळे, रवी कांदे, नरसिंग सिरसाट, रोहिदास बनसोडे, विठ्ठल दंदे, प्रशांत कराड, प्रभाकर कदम, प्रा. अजय गिते, गणेश होळंबे, बंडू निर्मळ, पिंटू रूपनर, तुकाराम आचार्य, जितेंद्र मस्के, राजाभाऊ मुंडे, ज्ञानोबा माऊली साबळे, पप्पू चव्हाण, चंद्रकांत देवकते, फुलचंद मुंडे, जालिंदर नाईकवाडे, रवी कराड आदींसह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
••••

No comments:

Post a Comment