तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 9 June 2018

अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट उघड.

बॉलिवुडचा दबंग, अर्थात अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याचा कट होता ही माहिती उघड झाली आहे. हा धक्कादायक खुलासा गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने केला आहे. गुरुग्रामच्या एसटीएफच्या टीमने हैदराबाद येथील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा खास असलेल्या संपत नेहराला अटक केली आहे. संपत नेहराने मे महिन्यात सलमान खानच्या घराची रेकी कोली होती. संपत नेहरा अभिनेता सलमान खानला त्याचा चाहता असल्याचे भासवून भेटणार होता आणि त्यानंतर त्याच्या हत्येचा प्रयत्न करणार होता अशी माहितीही समोर आली आहे.संपत नेहराने अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराची दोन दिवस रेकी केली होती. सलमान खान किती वाजता घराबाहेर येतो, किती वाजता घरी जातो. सुरक्षा रक्षक काय करतात या सगळ्यावर संपत नेहराने पाळत ठेवली होती. काळवीट शिकार प्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर लॉरेन्सचा खास असलेल्या संपत नेहराला अटक करण्यात आली. संपतच्या कटात आणखी कोण कोण सहभागी आहे याची माहिती एसटीएफची टीम गोळा करते आहे. संपत नेहराच्या चौकशीतून आणखीही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगात बसून सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. सलमान खानच्या हत्येची जबाबदारी संपत नेहरावर सोपवली होती. बिश्नोईची आणि संपत नेहराची ओळख तुरुंगातच झाली होती. तुरुंगातल्या ओळखीनंतरच संपत नेहरा बिश्नोईच्या गँगमध्ये सहभागी झाला होता. संपत नेहराला २०१६ मध्ये कार चोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याने बिश्नोईसोबत हातमिळवणी केली. आता संपत नेहराच्या चौकशीत काय काय समोर येणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment