तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 12 June 2018

नगर जिल्हा हादरला, नराधम वडिलांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार.


नगर जिल्ह्याची ओळख पूर्वी साखर कारखान्यांचा जिल्हा अशी होती परंतु गेल्याकाही वर्षात ही ओळख पुसून गुन्हेगारीचा जिल्हा अशी नगरची ओळख होत आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक श्रीरामपूर तालुक्यात घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी व मुलगा घरी नसताना संधी साधून वडिलांनीच जीवे मारण्याची धमकी देत १३ वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर तिच्या वडिलांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काल कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार गेल्या महिन्यातील २५ तारखेला घडला. पीडित मुलीची आई आणि भाऊ नातेवाईकांकडे नाशिक येथे गेले होते. त्या रात्री मुलगी व तिचे वडील घरी होते. रात्री वडिलानी मुलीला जीवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्रीराम शिंदे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पीडित मुलीसह आरोपीची वैद्यकीय तपासणी केली.

No comments:

Post a Comment