तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 5 June 2018

आई वडीलांचे संस्कार व सहकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ हेच प्रेरणास्थान - प्रदिप मुंडे


परळी दि.04

बीड जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदिपभैय्या मुंडे यांचा वाढदिवस आज परळीत उत्साहात साजरा झाला. आई वडीलांकडून समाज सेवेचे व जनकल्याणाचे झालेले संस्कार व सहकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ हेच आपल्या सार्वजनिक जिवनाचे प्रेरणास्थान असल्याचे भावनिक उद्‌गार यावेळी प्रदिपभैय्या मुंडे यांनी काढले. 

परळी येथील जवाहर लाल नेहरू  महाविद्यालयात प्रदिप मुंडे यांच्या वाढदिवसाचा अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांसह हजारो युवकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना प्रदिपभैय्या मुंडे यांनी समाज सेवेचे बाळकडू घरातून आई वडीलांच्या संस्कारातूनच मिळाले. लहानपणा पासूनच वडील प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी जनकल्याणासाठी केलेला संघर्ष, त्याग जवळून पाहिला. त्यातूनच आपल्याही मनात समाज सेवेचे व जनकल्याणासाठी काम करण्याची आवड निर्माण झाली.त्याला सहकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले. हिच शिदोरी घेवून भविष्यात आपण कार्य करणार असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. 

यावेळी अ.भा.कॉंग्रेसचे राष्ट्रीय सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे (सर), जेष्ठ नेते जनार्धन गाडे गुरूजी, प्रा.नरहरी काकडे, रिपाईचे राज्यसचिव भास्करनाना रोडे, प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे,  भालचंद्र तांदळे, न.प. सभापती गोपाळ आंधळे, सुर्यकांत मुंडे, शेख अहेमद अंकल, पंडीत झिंझुर्डे, विठ्ठल दंदे, इसाकभाई कठाळू, माणिकराव नागरगोजे, दत्तात्रय ढवळे, नारायणदेव गोपनपाळे, प्रभुअप्पा तोंडारे, बाबुभाई नंबरदार, प्रभाकर गवळी, माणिकराव सातभाई, आत्माराम कराड, शिवा महाजन, कृष्णा लोंढे, भिसाराम राठोड, प्रा.विजय मुंडे, विश्वनाथ गायकवाड, प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, ऍड. संजय जगतकर, व्यंकटराव गित्ते, दौलत ढाकणे, बाळु कुलकर्णी, छत्रपती कावळे, दिपक शिंदे, राहूल कांदे, किशोर जाधव, जम्मुसेठ, ताराचंद फड, ऍड. मनोज संकाये, संदिपान मुंडे, शिवा चिखले, गुलाबभाई पठाण, बबलु सय्यद, नवनाथ क्षिरसागर, शाम गडेकर, नागेश वाव्हळे, बाळासाहेब पाथरकर, राहूल काकडे, सोनु कांबळे, रघुनाथ डोळस, शिवा बडे, राहूल कराड आदि उपस्थित होते.

प्रदिप मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी शिवाजी चौक येथून शहराच्या प्रमुख मार्गावरून हजारो युवकांनी मोटार सायकल रॅली काढली. परळी शहर व तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गावागावातील नागरिकांनी प्रदिपभैय्या मुंडे यांचा सत्कार करून अभिष्ठचिंतन केले. बीड जिल्ह्यातील हजारो हितचिंतकांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा, प्रत्यक्ष भेटून अभिष्ठचिंतन केले.

No comments:

Post a Comment