तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Tuesday, 5 June 2018

अफझल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार- काँग्रेस


बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट होणार आहे. या भेटीमध्ये अमित शाह शिवसेनेचे मन वळवण्याचा प्रयत्न करतील का? अशी चर्चा होत असतानाच आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या भेटीवर उपहासात्मक ट्विट केले आहे. अफझल खान आणि उंदीर यांची गळाभेट होणार असे म्हणत त्यांनी या भेटीची खिल्ली उडवली आहे. सचिन सावंत यांच्या या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

No comments:

Post a Comment