तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

गर्भपात प्रकरणी डॉक्टर सह दाम्पत्यावर गुन्हा दाखल सिल्लोड येथील राजपूत हॉस्पीटल वर छापा


Vo-गर्भपात केल्या प्रकरणी सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटलचे डॉक्टर पती पत्नी सह दाम्पनत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा मारून चौकशी सुरु केली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव गोविंद फूलचंद राजपूत व त्याची पत्नी अरुणा गोविंद राजपूत राहणार सिल्लोड तर रघुनाथ शाहुबा गाडेकर वय 55 वर्ष,भिकाबाई शाहुबा गाडेकर वय 45 रा केळगाव ता सिल्लोड असे गर्भपात केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की 10 दिवसांपूर्वी आमठाणा परिसरात 1 सात महिन्याचे अर्भक सापडले होते. त्याचा धागा पकडून सिल्लोड पोलिसांनी केळगाव येथील दाम्पत्याला ताब्यात घेतले होते वय जास्त असल्याने समाजात बदनामी होईल या भीतिपोटि व आधी 4 मूल असल्याने अपत्य नको होते म्हणून गर्भपात केले असल्याचे रघुनाथ शाहुबा गाडेकर,भिकाबाई शाहुबा गाडेकर या दाम्पत्याने कबूल केले.तसेच पोलिसांनी अधिक माहिती विचारली असता त्या अर्भकाचे गर्भपात सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटल मध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याने पोलिसांनी दी 13 बुधवार रोजी राजपूत हॉस्पिटलवर छापा मारून चौकशी करुण त्या दाम्पन्त्याने केळगाव येथील ज्या ठिकाणी अभ्रक पूरले होते त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला.
अर्भक सिल्लोड पासून लांब आणून टाकण्याचे कारण काय, खरच या रुग्णालयात गर्भपात झाला आहे का.याचा शोध पोलीस घेत आहे.अजून तपास सुरू असून यात दोषी लोकां विरुद्ध कठोर कार्यवाही होईल अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार,पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.अधिक तपास ग्रामीण पोलिस ठान्याचे सपोनि विशवास पाटिल हे करीत आहे

अजय बोराडे : सिल्लोड

No comments:

Post a Comment