तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

महावितरणचा हलगर्जी आणी नियोजनशुन्य कारभार लोकांच्या जिवांवर बेतन्याची शक्यता


मंगरुळपीर-येथील महावितरणच्या बेजबाबदार आणी नियोजनशुन्य कारभारामुळे लोकांसाठी धोक्याची चिन्हे ठरत असुन आवश्यक ऊपाययोजनेकडे महावितरणचा कानाडोळा असलेला दिसत आहे.

           शहरात आणी खेड्यापाड्यातही ठिकठिकाणी धोकेदायक जीर्ण वीज तारांचे जाळे पसरलेले आह़े त्यामुळे महावितरण नागरिकांच्या जीवावर टपलयं की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आह़े वीज तारा अत्यंत जीर्ण झाल्या असल्याने यातून एखाद्या मोठय़ा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही़ 

मंगरुळपीर शहरातील अनेक ठिकाणी घराला लागूनच विद्युत पोल आहेत़ त्यामुळे साहजिकच वीज तारा या घराला लागूनच जात असल्याचे दिसून येत असत़े त्यामुळे यातून एखादी मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही़ अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज तारा लोंबकळलेल्या स्थितीत आह़े त्यामुळे हवेचा वेग वाढला की या तारा एकमेकांना लागून घर्षण निर्माण होत असत़े त्यामुळे साहजिकच यातून काही वेळा ठिणग्यादेखील पडत असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े.काही दिवसापुर्वी शहरालगतच्या कोठ्याला अशाच कारणाने आग लागली होती,काहींची गुरेही या आगीमध्ये मृत्युमुखी पडली होती.

दरम्यान, अनेकांच्या घराला लागूनच वीज तारा गेल्या असल्याने काही नागरिकांकडून या वीज तारांना प्लॅस्टिक पाईपांचे आवरणदेखील  लावण्यात आले आह़े परंतु हा तात्पुरती उपाय असून महावितरणने याबाबत काही तरी कार्यवाही करुन ही समस्या दूर करावी अशी मागणी आता संबंधित नागरिकांकडून करण्यात येत आह़े.शहरातील काही वस्त्यांच्या ठिकाणीसुध्दा वीज तारांची दयनिय अवस्था झाली आह़े बहुतेक वीज तारा झाडांमधून गेल्या आहेत़ त्यामुळे हवेच्या वेगाने झाड हेलकावे खात असताना यातून वीज तारा तुटण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े हाय होल्टेज वीज तारा असल्याने यातून जीवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अनेक नागरिकांच्या गॅलरीमधूनही वीज तारा जात असतात़ घरात लहान मुले असल्याने यातून एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरीकांकडुन विचारण्यात येत आह़े.                                                  फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835

No comments:

Post a Comment