तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

उद्धव ठाकरे आणि अमित शहांमधील बैठक संपली; तब्बल दोन तास झाली चर्चा.


भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमधील बैठक संपली आहे. अमित शहा उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पावणे आठच्या सुमारास मातोश्रीवर पोहोचले होते. त्यांच्यात साधारणत: साडेआठ पर्यंत चर्चा होणार होती. मात्र ही चर्चा नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ चालली. अमित शहा आणि उद्धव ठाकरें मध्ये तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. या बैठकीत नेमकी काय खलबतं झाली, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात रात्री आठ ते साडेआठ या कालावधीत चर्चा होणार होती. मात्र प्रत्यक्षात ही चर्चा दहा वाजेपर्यंत सुरू होती. या मॅरेथॉन बैठकीत नेमकं काय झालं, कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं. विशेष म्हणजे मातोश्रीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात मॅरेथॉन चर्चा झाली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे अमित शहांना सोडण्यासाठी मातोश्रीच्या दरवाज्यापर्यंत आले होते. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी अमित शहा यांना नमस्कार देखील केला. त्यामुळे या दोन नेत्यांमधील चर्चा सकारात्मक झाली, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

No comments:

Post a Comment