तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 10 June 2018

अल्लाहला खूश करण्यासाठी पित्यानं चिरला पोटच्या मुलीचा गळा.


सध्या मुस्लिमांचा पवित्र महिना रमझान सुरू आहे. जगातल्या प्रत्येक देशातले जवळपास दोनशे कोटी मुस्लिम रमजानमध्ये रोजे ठेवतात. सहेरी, इफ्तार, तराविह, कुरआन पठन, एतेकाफ वगैरे उपासना सर्वत्र केल्या जातात. परंतु याच रमझान महिन्याला एका पित्यानं गालबोट लावलं आहे.रमझानच्या पवित्र महिन्यात अल्लाहला खूश करण्यासाठी एका नराधम पित्यानं चक्क स्वतःच्या मुलीचा गळा चिरला. राजस्थानमधल्या जोधपूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, नराधम पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवाब कुरेशी या पित्यानं रमझानच्या पवित्र शुक्रवारी चक्क चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीची गळाचिरून हत्या केली. एका कथित मौलवीनं श्रीमंत होण्यासाठी मुलीचा नरबळी देण्यास सांगितलं होतं. त्यानंतर नवाब मुलीला मारण्याच्या प्रयत्नातच होता.
परंतु मुलगी रिझवाना सुट्टी निमित्त आईबरोबर मामाकडे गेल्यानं त्याची अडचण झाली होती. गुरुवारी नवाबनं पत्नीला मुलगी रिझवानाला फिरायला नेतो सांगत तेथून नेले. त्यानंतर तिला खाऊ वगैरे दिला. रात्री घरी आल्यानंतर मुलगी झोपेत असतानाच पहाटेचा पहिला नमाज अदा करून त्यानं मुलीचा गळा चिरला. या घटनेनं जोधपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment