तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 9 June 2018

राजधानीत चकमकीमध्ये चार गँगस्टरचा खात्मा.


राजधानी नवी दिल्लीत पोलीस आणि भारती गँगमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. यात दिल्ली पोलिसांच्या जवानांनी ४ गँगस्टरला ठार करण्यात यश मिळवले तर एक जण जखमी झाला आहे. पोलीस आणि गँगस्टरच्या चकमकीत आठ पोलीसही गोळी लागल्यामुळे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागामध्ये दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि भारती गँगमध्ये चकमक उडाली. छतरपूर येथे राजेश भारती आपल्या गँगसोबत येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली. पोलिसांनी भारती गँगला पकडण्यासाठी जाळं टाकलं. पोलिसांना पाहताच भारती गँगच्या सदस्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले. यात मोस्ट वाँटेड राजेश भारती आणि त्याच्या गँगमधील पाच जणांना पोलिसांच्या गोळ्या लागल्या. यातील चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जखमी झाला.

No comments:

Post a Comment