तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 June 2018

जिंतुरचा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून पिक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूकपिक कर्ज तातडीने वाटप करा नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा संभाजी ब्रिगेडचा इशारा

जिंतूर
तालुक्यात सध्या मान्सून पूर्व पावसाने जोरदार आगमन केले असल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे परंतु पेरणीसाठी पैसे नसल्याने पिक कर्जसाठी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत चकरा मारत आहेत मात्र बँक शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असून अडवणूक करत असल्याचा आरोप करून संभाजी ब्रिगेडचा वतीने 8 जून रोजी तहसील प्रशासनास निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे..
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जिंतूर तालुका हा मागील तीन वर्षांपासून दुष्काळ ग्रस्त आहे   यातच मागील वर्षी कमी प्रमाणात उत्पन्न झाले असल्याने पेरणी साठी बि बियाणे खते खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत परिणामी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर शाखेत शेतकरी पिक कर्ज काढण्यासाठी चकरा मारत आहेत परंतु शाखाधिकारी व बँक कर्मचारी शेतकऱ्यांना तुच्छ वागणूक देत असून बँकेचे ऑडीट चालू असून 25 जून नंतर देऊ असे सांगत आहेत परंतु सध्या तालुक्यात मान्सूनचा पाऊस चांगला झालेला आहे यामुळे या आठवड्यात पेरणी करणे गरजेचे आहे परंतु बँकेच्या अडणुकीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहेत यातच मागील आठवड्यात सावळी येथील तरुण शेतकऱ्याने बि बियाणे खरेदीसाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे सध्या पेरणी तोंडावर असताना शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळाले नाही तर शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून शेतकऱ्यांना पिक कर्ज तातडीने मंजूर करून वाटप करावे अन्यथा तालुक्यात एखाद्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली तर बँक अधिकारी व महसूल प्रशासनास जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे,इरशाद चांद पाशा,राधाकिशन खूपसे,बाबासाहेब बचाटे, विनोद पिंगळे,अनिल गाडेकर,गणेश मगर,सखाराम कवडे छत्रपती शिंदे विनोद मस्के,दीपक डोंबे,सोपान धापसे, पिंटू डोंबे,सुमीत डोईफोडे,नयूम पठाण,भगवान रोकडे, महेश राठोड,राजू खवणे,सिद्धांत औसेकर,गणेश थिटे आदींच्या सह्या आहेत

No comments:

Post a Comment