तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

सेनगावात शिवसेनेचा महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात निद्रा आदोंलन

विश्वनाथ देशमुख सेनगावकर

सेनगाव:- येथील तालुका महावितरण कार्यालयात महावितरणच्या अनागोदी कारभारा विरोधात दि.06 जुन बुधवार रोजी सकाली 11 वाजता हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निद्रा आदोंलन केले.
अधिक माहीती अशी की,सेनगाव महावितरण कार्यालयाचा कारभार अनागोंदी चालला असुन तालुक्यात नेहमीच थोड्या फाँल्ट साठी पुर्णच विजपुरवठा बंद केल्या जातो.तालुक्यातील ब-याच गावातील डिपी ह्या नादुरुस्त असल्याने थोडासा जरी फाँल्ट असला तर पुर्ण गाव रात्रभर अंधारातच राहत आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी मे महिन्यातच नादुरुस्त डि.पी.दुरुस्ती व जागोजागी लोंबकलत असलेल्या विज वाहीन्या बरोबर करण्याच्या सुचना दिल्या होत्या.परंतु दि.-3 जुन रोजी रात्रभर सेनगाव तालुका वासियांना अधांरात काढावी लागली तर दि.04 जुन सोमवार रोजी दिवसभर लाईट गुल होती आता तर पाच-पाच मिनिटांनी लाईट गुल होण्याचे प्रमाण वाढले असुन यामुले वृध्दासह लहान बालकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आज दि.06 जुन बुधवार रोजी हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारीसह शिवसैनिकांनी विजेचा सुरलीत पुरवठा होण्याच्या मागणीसाठी सेनगाव तालुका महावितरण कार्यालयात निद्रा आदोंलन केले.यावेली शिवसेना सेनगाव शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख,नगरसेवक प्रविण महाजन,मंगेश पवार,कवरदडीचे सरपंच दिलीप कुंदर्गे,निखिल देशमुख, जगदीश गाढवे-पाटील,संतोष गाढवे-पाटील,अमजद पठाण,वैभव देशमुख,शिवाजी देशमुख आदी शिवसेना पदाधिकारीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महावितरण ने सेनगांव तालुक्यात सुरलीत विजपुरवठा न केल्यास तिव्र आदोंलन छेडण्यात येईल असा ईशारा उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे. शिवसेनेचे निद्रा आदोंलन चालु असल्याची माहीती मिलताच कार्यकारी अभियंता जाधव यांनी भेट देऊन सेनगाव तालुक्यातील विज पुरवठा दोन दिवसात सुरलीत होईल व नादुरुस्त डि.पी.व जागोजागी लोबकललेल्या तारा आठ दिवसात दुरुस्ती केल्या जातील असे आश्वासन दिल्याने निद्रा आदोंलन मागे घेण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment