तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

कत्तलीसाठी गायींची तस्करी : तिघांच्या मुसक्या आवळल्या.


गायींची तस्करी करणाऱ्या तीन परप्रांतीयांच्या सातारा पोलिसांनी मंगळवारी सकाळी पैठण रस्त्यावरील माँ-बाप दर्ग्याजवळ मुसक्या आवळल्या. पोलिसांनी तस्करांच्या तावडीतून १३ गायांची सुटका करून त्यांना बेगमपुरा परिसरातील गोशाळेत हलविण्यात आले. सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांचे पथक पैठण रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना पैठण रस्त्यावरून जात असताना एक ट्रक निदर्शनास आला. ट्रकचालकास जाधव यांच्या पथकाने थांबण्याचा इशारा केल्यामुळे चालकाने ट्रकचा वेग वाढविला. ट्रकचा वेग वाढविला असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करूनमाँ- बाप दर्ग्याजवळ ट्रक अडविला. त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये कोंबलेली जनावरे आढळून आली. जनावरांच्या वाहतुकीच्या परवान्यांची चौकशी केली असता ट्रकमध्ये असलेल्या चंदूभाई सोलंकी, राहुल चव्हाण (दोघे, रा. राजकोट, गुजरात) आणि तामिळनाडूचा शिवकुमार सर्वानंद यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.पोलिसांनी त्या तिघांना खाक्या दाखवताच त्यांनी १३ गायी, २ बैल आणि १ वासरू अशी १६ जनावरे राज्यस्थानातून तामिळनाडूला घेऊन जात असल्याचे सांगितले. ही जनावरे अवैधरीत्या घेऊन जात असल्यामुळे त्या तिघांना ताब्यात घेतले. या ट्रकमधील असलेल्या १६ जनावरांना बेगमपुरा परिसरात असलेल्या गोशाळेत हलविण्यात आले. पोलिसांनीत्या तीन परप्रांतीयांना अटक केली असल्याचे पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment