तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

पाकिस्तानच्या कुरापती थांबेनात, गोळीबारात भारताचे चार जवान शहीद, पाच जखमी.


नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बेछुट गोळीबार केला असून, या गोळीबारात भारताच्या चार जवानांना वीरमरण आले आहे, तर पाच जवान जखमी झाले आहेत. रामगड विभागातील चांबियाल येथे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत रात्रीपासून तुफान गोळीबार सुरू केला आहे.
जम्मूमधील रामगड विभागातील चमलियाल पोस्टवर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या गोळीबारत बीएसएफच्या एका असिस्टंट कमांडरला वीरमरण आले आहे. मंगळवारी रात्रीपासूनच पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार करत आहेत. या गोळीबारत चार जवान शहीद झाले आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत. भारताकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनामध्ये वाढ झाली आहे. याआधी शनिवारी अखनूर मधील परगवाल विभागातही पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला होता. यात बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते.

No comments:

Post a Comment