तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 14 June 2018

दुचाकीवरुन पडून एकजण जागीच ठार कासारवाडी - पोहनेर रोडवरील घटना

सिरसाळा  प्रतिनिधि  : मद्य धुदं अवस्थेत दुचाकी  गाडी चालवणारा युवक गाडीवरुन पडल्याने जागीच मृत्यु पावल्याची घटना काल गुरुवारी घडली आहे . बालाजी दत्तात्र्ये राऊत वय ३५ वर्षे रा. पाथरी जि. परभणी असे त्यी युवकाचे नाव व पत्ता आहे. गरुवारी पहाटे कासारवाडीहून पाथरी कडे हा युवक आपली दुचाकी एम. एच. ३८ एन २११४ वरुन जात होता . मध्य धूदं अवस्थेत असल्याने यास दुचाकी वेवस्थीत चालवता आली नसावी आणि वेगात ही गाडी पडली व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ह्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या खिशात देशी दारुची बाटली देखील मिळून आली आहे. सकाळी घटना समजताच मिर्झा एपीआय राठोड, पिएसआय  भूजबळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी करुन प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे पाठवले. सिरसाळा पोलिस स्टेशन येथे घटनेची रितसर नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पो. हे. काॅ. नन्नावरे करत आहेत.

No comments:

Post a Comment