तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

स्वयंघोषित पीए  विलास तांगडे विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाथरीचे तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी दिली पोलिसात तक्रार

पाथरी:- येथील तहसीलदार वासुदेव शिंदे यांना एका स्वयं घोषीत पीए कडून १२ जुन रोजी रात्री फोन करून माझं काम कर परभणीला रेष्ट हाऊस वर आताच आता ये, तु वाळूत काय दिवे लावतोस आजची रात्र तुला कायम आठवणीत राहील अशी अरे कारेची भाषा वापरत धमकी दिल्याने या स्वयंघोषित पीए विलास तांगडे विरोधात पाथरी पोलीसात तहसिलदार वासूदेव शिंदे यांच्या तक्रारी वरुन कलम ५०७नुसार गुन्हा दाखल झाला आहे. संबंधीत स्वयंघोषित पीए ने ९०७५९७९२६३ या क्रमांका वरून मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता हा फोन केवला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फोन करून धमकवने , शिवीगाळ आणि सस्पेंड करायची धमकी दिल्याची तक्रार तहसिलदार वासूदेव शिंदे यांनी पाथरी पोलीसात दिली आहे.या पुर्वी समाधान शिबिराच्या निमित्ताने पंचायत समिती सभागृहातील बैठकी नंतर लोणी बु येथील शेतकरी फुके नावाच्या शेतक-याने शेतकरी पीक विम्या संदर्भाने प्रश्न विचारल्या नंतर त्या शेतक-याला शेकडो जनांच्या उपस्थितीत शिवीगाळ करून याला अटक करा ,हा दारू पिलेला आहे अशा सुचना पोलीसांना केल्या होत्या या वेळी या विरोधात जनसामान्यां मध्ये संताप व्यक्त होत होता. या संवादाची ऑडिओ क्लीप सोशल मिडीयात व्हायरल झाली असून हा नेमका प्रकार काय आहे या विषयी नागरीकांत मोठा चर्चा होतांना दिसत आहे.

दरम्यान या प्रकारा विषयी मंत्री बबनराव लोणीकर यांचे स्वियसहायक शामसुंदर शिंदे यांनी मंत्री लोणीकर यांच्या लेटरहेड वर या प्रकारा विषयी खुलासा करतांना म्हटले आहे की, काही न्यूजचॅनल आणि वर्तमानपत्रां मधून संबंधीत तांगडे नावाची व्यक्ती मा ना बबनराव लोणीकरांचा पीए असल्याच्या बातम्या बुधवार दुपार पासुन प्रसिद्ध होत आहेत मात्र संबंधित व्यक्ती ही ना लोणीकरांचा पीए नसल्याचा खुलासा केला असुन मंत्री लोणीकर हे इस्रायल दौ-यावर गेले असल्याचे त्यांनी तेजन्यूज हेडलाईन्स शी सांगितले आहे.


No comments:

Post a Comment