तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 11 June 2018

काबूल मध्ये सरकारी कार्यालयाजवळ स्फोट, १२ ठार, ३१ जण जखमी.


अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील मंत्रालयाबाहेर झालेल्या स्फोटात किमान १२ ठार तर ३१ जण गंभीर जखमी झाले. रमजानसाठी कर्मचारी कार्यालयाबाहेर जाण्याच्या गडबडीत असतानाच हा स्फोट झाला. हा आत्मघातकी स्फोट असल्याचे सांगण्यात येते. मंत्रालयाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाल्याचे ग्रामीण पुनर्वसन आणि विकास मंत्रालयाचे प्रवक्ते दाऊद नैमी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. महिला, मुलं आणि कर्मचारी या स्फोटाचे बळी ठरल्याची माहिती अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली.तालिबानी दहशतवाद्यांनी शनिवारी एक आश्चर्याचा धक्का देणारी घोषणा केली होती. या आठवड्या अखेरीस ईदची सुटी असल्यामुळे तीन दिवसांची शस्त्रसंधी जाहीर केली होती. त्यानंतर सरकारनेही त्वरीत तालिबान विरोधात शस्त्रसंधीची घोषणा केली होती.

No comments:

Post a Comment