तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 June 2018

दानवेंना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी - अर्जुन खोतकरांचा घणाघात.


भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे, असा घणाघात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंवर केला आहे. दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे असा आरोप खोतकरांनी दानवेंवर केला. वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर घणाघाती टीका केली. रावसाहेब दानवेंचा जालन्यातील सरकारी आधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून सर्वच आधिकाऱी त्यांच्या दहशतीखाली आहेत असे वक्तव्यही खोतकर यांनी यावेळी केले.  दानवे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तासनतास आपल्या कक्षाबाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान रावसाहेब दानवे यांना डावलण्यात खुद भाजपाच्या नेत्यांचाच हात होता. दानवे शिवसेना संपवायला निघाले, तुम्ही त्यांना समज द्यायला पाहिजे,अशा स्वरुपाची मी संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहितीही खोतकरांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment