तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 13 June 2018

पूर्णा नदीवरील पुलाला भगदाड.


माजलगावकडे जाणाऱ्या (ताडकळस मार्गे) जाणाऱ्या राज्य मार्गावरील पूर्णा नदीवर असलेल्या मोठ्या पुलाच्या कडेला भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक जीवघेणी झाली असून या बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. पूर्णा शहरापासून काही अंतरावर असलेल्या पूर्णा नदीवर ताडकळस कडे जाणाऱ्या माजलगाव राज्य रस्त्यावर गत २५ वर्षापूर्वी पूल उभारण्यात आला. या पुलाचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. सुमारे अर्धा कि.मी. रुंद व दीड कि.मी. लांबीच्या या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. मागील काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्याअक्षम्य दुर्लक्षामुळे पुलाचे कठडे नादुरुस्त झाली तर आता या पुलाच्या एका कडेला टोपल्या एव्हढे मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडातून पूर्णा नदीचे पाणी दिसत असून वाहनधरकाचा जीविताला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पुलावर पाणी साचले होते, ते पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने ते पाणी जागेवरच झिरपले. त्यामुळे पुलावरील डांबरी रस्ता खचून गेला आहे.

No comments:

Post a Comment