तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

मराठी उद्योजकांनी आक्रमक व्हायला हवं : राज ठाकरे

बाळू राऊत
मुंबई :आज आपल्या देशात हातावर मोजण्याइतके मराठी उद्योजक राहिले आहे .दिवसेन दिवस मराठी टक्का घसरत आहे .आज असंख्य मुले शिकत आहे पण सरकार सगळ्यांना नोकरी देईलच  असे नाही आता फक्त शिक्षण घेऊन चालणार नाही.आता उद्योग क्षेत्रात उतरने गरजेचे आहे .उद्योगात अनेक चढउतार येतात पण त्यांना समोरे जाऊन मराठी माणसाने देखील आपला टसा उमटविने गरजेचे आहे .तरच आपन यामध्ये पुढे जाऊ . तुम्ही मराठी व्यावसायिकांची डिरेक्टरी तयार करा. मी तुम्हा व्यावसायिकांना पुढे जायला  मदत करेन.असे उदगार राज ठाकरे यांनी  महाराष्ट्र बिझनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना केले .
महाराष्ट्र बिझनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना राजसाहेबांनी मार्गदर्शन केलं.
त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे मराठी उद्योजकांनी आक्रमक व्हायला हवं.
मुळात व्यवसाय करताना महाराष्ट्र ही भूमी समजवून घ्यायला हवी.
महाराष्ट्रात बाहेरून जे आले ते इथे व्यवसायात शिरले आणि आपण नोकरी करत बसलो.
पण हे समजून घ्यायला हवं की उद्योग, व्यवसायासाठी इथली भूमी पोषक होती म्हणून ते इथे येऊ शकले आणि यशस्वी होऊ शकले.  आपलं दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातील शहरांचं महत्व मराठी माणसांनाच कळत नाहीये.
आपल्या शहरांमध्ये मराठी लोकसंख्या कमी होत आहे आणि बाहेरील लोकांची संख्या वाढत आहे
ठाणे जिल्ह्यात ७-८ महानगरपालिका आहेत ठाण्यात लोकसंख्या वाढत आहे. ही शहरं जर मराठी माणसाच्या हातातून गेली तर तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही
महानगर पालिकेत कंत्राटदार राजस्थान मधील एका गावातील आहेत.ह्यावरून राजस्थानच्या लोकांच्या अंगात व्यवसाय किती भिनलाय हे तुम्हाला जाणवेल.
आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जर वाटत असेल की आपल्या राज्याचा विकास व्हावा हेच त्यांच्या मनात सातत्याने असतं. त्यांना बुलेट ट्रेन पण गुजरातमध्येच हवी असते. मग आपण आपल्या राज्याचा, मराठी माणसाचा विचार का करू नये?
महाराष्ट्राला मिळालेल्या एकूण ८ भारतरत्नांपैकी ७ कोकणात आहेत. आज अशा कोकणात चायनीजच्या गाड्या का लागतात? तिथे आपले पदार्थ का मिळत नाहीत?
मी राजकीय पक्ष काढला. चाड उतार मला पण बघायला लागले. तुम्ही व्यवसाय करताय तेंव्हा तुम्हाला पण चढ उतार बघावे लागणार. पण ह्याने डगमगून जायचं नाही

No comments:

Post a Comment