तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 June 2018

तेल्हारा येथे शिवराज्यभिषेक साजरा करून सर्व पक्षांच्या वतीने शेतकरी संपाला दिला पाठींबा


तेल्हारा : ६ जून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधीन आज तेल्हारा तालुक्यासह शहरातील सर्व पक्षाच्या वतीने शेतकरी संपाला पाठींबा देत छत्रीपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करून हारार्पण करण्यात आला. तालुक्यातील शेतकरी व सर्व पक्षातील पाधाधीकार्यांसह नागरिकांनी भाजी पाला रस्त्यावर फेकून भाजप सरकारचा जोरदर घोषणाबाजी करून निषेध दर्शविण्यात आला व शेतकरी संपाला पाठींबा देण्यात आला.
आज ६ जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिन असून छत्रपती शिवाजी महाराज्यांनी गोरगरीब जनतेला कधीच संकटात टाकले नसून त्यांचावर कोणतेच दुखः येवू दिले नाही, परंतु सध्याचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला योग्य भाव तर मिळतच नाही शिवाय त्याची वेळेवर खरेदी सुद्धा होत नसल्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी आज फार मोठ्या संकटात सापडला आहे. सध्या पेरणीचा हंगाम असून शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ भाजप सरकारने आणली असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलतांना सांगितले. जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या १० जूनला सर्व पक्षीय चक्काजाम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी प्रवीण वैष्णव, प्रशांत देशमुख, रवी ताथोड, विकी मल्ल, गोवर्धन पोहरकार, रामाभाऊ फाटकर, गणेश बवास्कार, भैय्या देशमुख, अनंता सोनमाळे, अशोक दारोकार, विकास पवार, सचिन थाटे, वैभव खाडे, यांसह शेतकऱ्यांमध्ये निलेश काकड, प्रतिक अवताडे, स्वप्नील भारसाकळे, संदीप दांदळे, योगेश जुम्बळे, विजय आकोते, नंदकिशोर बावस्कर यांसह असंख्य शेतकरी नागरिक हजर होते.
विशाल नांदोकार
तेल्हारा तालुका प्रतिनिधी

No comments:

Post a Comment