तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 June 2018

गिरजा-पुर्णा हायस्कुलची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम.


10वी सेमीचा निकाल 100% तर मराठी माध्यमाचा 98% निकाल

गणेश एन. सोळुंके, (भोकरदन ग्रामीण)
---------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत दहावीच्या परिक्षेत वालसा खालसा येथील गिरजा-पुर्णा हायस्कुलने आपल्या निकालाची परंपरा कायम राखली.
या विद्यालयाचा सेमीचा निकाल 100% तर मराठी माध्यमाचा निकाल 98.00% लागला. सेमी माध्यमातुन बाबासाहेब कोल्हे 87 टक्के घेऊन प्रथम तर सुमित्रा प्रधान 85% घेऊन द्वितीय आणि शिवानी तुपे 83.40% घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे.
मराठी माध्यमातुन शाकेर शहा याने नेत्रदिपक कामगिरी करत 93% घेऊन शाळेतुन प्रथम येण्याचा मान पटकावला तर , दिपक तमखाने 81.20% व दिपाली दानवे 81.00% यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
अभ्यासातील सातत्य, गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन, आई वडिलांचे आशिर्वाद यामुळे आपण हे यश संपादन करु शकल्याचे शाकेर शहा याने सांगितले. ग्रामीण भागातील या शाळेने चांगल्या यशाची परंपारा कायम राखल्यामुळे पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
शाळेच्या उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष के.जे.जाधव, प्राचार्य के.के.जाधव, सुरडकर, पी.डी.जाधव, ठाकरे, सतिश देशमुख, दानवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केल आहे.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी :गणेश एन. सोळुंके, भोकरदन ग्रामीण.
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं.7888257555
व्हाॅट्स अॅप : 8390132085  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment